अक्षय शिंदेचा मृतदेह दहन करण्याऐवजी पुरणार

बदलापूर: बाललैंगिक अत्याचारातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याची चकमकीत हत्या झाल्यानंतर आता त्याच्या अंत्यसंस्कारावरून समस्या निर्माण झाली आहे. अक्षय शिंदे याच्या अंत्यसंस्काराला बदलापूरकरांनी विरोध केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 26 Sep 2024
  • 10:34 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बदलापूर: बाललैंगिक अत्याचारातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याची चकमकीत हत्या झाल्यानंतर आता त्याच्या अंत्यसंस्कारावरून समस्या निर्माण झाली आहे. अक्षय शिंदे याच्या अंत्यसंस्काराला बदलापूरकरांनी विरोध केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील पुरावे नष्ट होऊ नये यासाठी अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे दहन केले जाणार नाही. त्याऐवजी मृतदेह पुरण्यात येणार असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी दिली.

कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मांजर्लीतील सार्वजनिक स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. अक्षय शिंदे हा बदलापूरमध्ये राहत असल्याने त्याच्यावर पालिकेच्या स्मशानभमीत अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. मात्र याला नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे.

अक्षय शिंदे याचे मांजर्ली स्मशानभुमीत कोणत्याही परिस्थितीत अंत्यसंस्कार होऊ देणार नाही,असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. अंत्यसंस्काराला कोणीही विरोध करु शकत नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्या ठिकाणी कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत.

अक्षय शिंदे याचे नाव याप्रकरणी समोर आल्यानंतर नागरिकांनी त्याच्या कुटुंबाला हाकलून लावले होते. गेल्या महिनाभरापासून शिंदे याचे घर बंद आहे. त्याचे कुटुंबीय बदलापूर बाहेर राहत आहेत. त्याबदलापूर शहराचे नाव बदनाम करून अत्याचार करणाऱ्या नराधमावर बदलापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू दिले जाणार नाहीत,असा पवित्रा बदलापुरातील नागरिकांनी घेतला आहे.

अक्षय शिंदे याच्यावर जेज रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आला. अक्षय शिंदे हा बदलापूरच्या खरवई परिसरात राहात होता. तेथे त्याचे छोटे घर आहे. बदलापूर प्रकरणानंतर जमावाने त्याच्या घराची तोडफोड केली होती. तेव्हा पासून त्याचे घर हे बंद होते. अक्षयचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहेत. त्याच्यावर बदलापूर इथेच अंत्यसंस्कार होणार आहेत. अक्षयचे नातेवाईक बदलापूर येथील त्याच्या घरी दाखल झाले आहेत

त्यातच अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचं दहन न करता त्याचा मृतदेह पुरण्यात येणार आहे.अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकिल अ‍ॅड. अमित कटारनवरे म्हणाले, पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून मृतदेह दहन न करता पुरला जाणार आहे. ज्यामुळे भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. मृतदेह पुरण्यासाठी देखील जागा मिळत नाही. आम्हाला आमच्या मुलासाठी न्याय मिळवून द्यायचा आहे, असे अक्षय शिंदे याच्या वडिलांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest