खऱ्या युद्धापूर्वी कुरघोडींना वेग; राज्यपालनियुक्त सात आमदारांचा शपथविधी

राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी विधानसभेत सुरू आहे. विधान परिषदेचे सात आमदार मंगळवारी (दि. १५) निवडले गेले आहेत. उपसभापतींच्या उपस्थितीत या सातजणांना आमदारकी देण्यात आली.

खऱ्या युद्धापूर्वी कुरघोडींना वेग; राज्यपालनियुक्त सात आमदारांचा शपथविधी

मुंबई : राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी विधानसभेत सुरू आहे. विधान परिषदेचे सात आमदार मंगळवारी (दि. १५) निवडले गेले आहेत. उपसभापतींच्या उपस्थितीत या सातजणांना आमदारकी देण्यात आली. या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होत्या. विरोधकांनी दाखल केलेल्या याचिकेत या नियुक्त्यांना स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. मात्र न्यायालयाने सुनावणी घेतली पण स्थगिती दिली नाही.  

कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात दाखल केलेली याचिका आणि इतर काही अन्य याचिकांवर गेल्याच आठवड्यात सुनावणी पार पडली. त्यावेळी या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. अद्याप हा निकाल आलेला नाही, तसेच तो कधी येईल याचीदेखील शाश्वती नाही. याबाबत स्पष्ट करताना निर्णय राखून ठेवताना न्यायालयाने या प्रकरणी कोणतेही निर्देश सरकारला दिलेले नव्हते, त्यामुळे नियुक्त्या कायदेशीर असून त्या करण्याचा सरकारचा मार्ग मोकळा असल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी देखील ठाकरे गटाने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीला स्थगिती मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते. तेव्हाही उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. तिच परिस्थिती आता पाहायला मिळाली.

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांकडून याचिका न्यायालयात सादर करण्यात आली. निकाल राखून ठेवताना कोणतेही निर्देश नव्हते, असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला. महंत बाबूसिंग महाराज हे बंजारा समाजाचे धर्मगुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी पोहरादेवीचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांना सगळी माहिती देण्याचे काम बाबूसिंग महाराज यांनी केले होते. त्याचप्रमाणे विक्रांत पाटील आणि चित्रा वाघ यांनाही भाजपने विधान परिषदेची आमदारकी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते हेमंत पाटील हे तिकीट कापल्याने नाराज झाले होते त्यांना आता विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे, तर मनीषा कायंदे या सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेच्या आमदार  झाल्या आहेत.

विधान परिषदेसाठी निवडलेले गेलेले सात आमदार कोण?

हेमंत पाटील, शिवसेना (एकनाथ शिंदे)

मनीषा कायंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे)

पंकज भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

इद्रिस इलियास नाईकवाडी, 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

महंत बाबूसिंग महाराज, बंजारा समाजाचे धर्मगुरू (भाजप)

विक्रांत पाटील (भाजप)

चित्रा वाघ (भाजप)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest