भाजपच्या माजी खासदारांचे पुत्र हातात घड्याळ बांधून रिंगणात?

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.ऊर्फ आबा पाटील यांच्या निधनानंतर पोरका झालेल्या तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात दोन ज्युनिअर पाटलांमध्ये निवडणूक रंगण्याची शक्यता आहे.

BJP

भाजपच्या माजी खासदारांचे पुत्र हातात घड्याळ बांधून रिंगणात?

तासगावमध्ये रोहित पाटलांच्या विरोधात प्रभाकर पाटील

#सांगली : शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.ऊर्फ आबा पाटील यांच्या निधनानंतर पोरका झालेल्या तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात दोन ज्युनिअर पाटलांमध्ये निवडणूक रंगण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर हातात घड्याळ बांधून रिंगणात उतरणार अशी शक्यता दिसते. 

 शरद पवार गटाकडून आर.आर. यांचा मुलगा रोहित यांची उमेदवारी निश्चित असली तरी महायुतीमधील पेच अद्याप सुटलेला नाही.या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरायचे असेल तर त्यांना हाती 'घड्याळ'  बांधावे लागणार असल्याची चर्चा आहे. येथे रोहित पाटील विरूद्ध प्रभाकर पाटील अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

प्रभाकर पाटील यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी मोर्चेबांधणी केली असून ते निवडमूक लढवणार हे नक्की आहे. महायुतीत हा मतदारसंघ भाजपशिवाय ज्या मित्रपक्षाच्या वाट्याला जाईल, त्या पक्षात प्रभाकर पाटील यांना प्रवेश करावा लागणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे मतदारसंघात सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे प्रभाकर पाटील लवकरच घड्याळ हातात बांधून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय पाटील यासाठी मुंबईत ठाण मांडून आहेत. त्यामुळे लवकरच आणखी एक मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार आहे.

आबा यांच्या निधनानंतर काही वर्षांमध्ये आबांचे कुटुंब आणि संजय पाटील गटात कधी वाद, तर कधी सामंजस्य होऊन वाद टाळले जायचे. गेल्या काही निवडणुकीत दोन्ही गटाने वाद टाळले. आता आपल्या मुलाला राजकारणात आणणार नाही, असे काही वर्षांपूर्वी खासगीत म्हणणाऱ्या संजय पाटील यांनी मात्र अलीकडेच मुलगा प्रभाकरला राजकारणात लॉन्च केलं आहे. त्यामुळे दोन सिनिअर पाटलांमधील संघर्ष आता ज्युनिअर पाटलांपर्यंत येऊन पोहोचला आहे

 तासगाव विधानसभा मतदारसंघातील माजी खासदार संजय पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्यातील संघर्ष पुढच्या पिढीतही पहायला मिळणार आहे. एकीकडे रोहीत पाटील हा तासगावमधून विधानसभा निवडणूक लढवणार हे नक्की असताना संजय पाटील हे अजित पवारांच्या पक्षाकडून प्रभाकरला मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत अजित पवारांची भेट घेतली. भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या संजय पाटलांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी दोनवेळा शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र शरद पवारांच्या पक्षाकडून तासगाव मधून रोहित पाटील यांचे नाव नक्की समजलं जातं असल्याने संजय पाटील मुलाला अजित पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायेत. अजित पवार आणि दिवंगत आर आर पाटील यांचे संबंध सर्वश्रुत होते. त्यामुळे अजित पवार तासगावबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे.

याबाबत संजय काका पाटील म्हणाले, तासगाव- कवठेमहाकाळ हा विधानसभा मतदारसंघ पूर्वी राष्ट्रवादीकडे होता. अजून जागावाटप निश्चित व्हायचे आहे. त्या संबंधात भेट घेतली. अजित पवार यांच्या भेटीनंतर मी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. तो मतदार संघ त्यांच्याकडे राहणार असेल तर काय करायचे या उद्देशाने ही भेट झाली. ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार का यासंदर्भात दादांशी चर्चा केली आहे. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे.  वृत्तसंंस्था

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest