सोलापूर : हायटेक प्रभागासाठी आम्ही कटिबद्ध; प्रभाग २२ चे नगरसेवक किसन जाधव यांची ग्वाही
सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २२ येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात आघाडीवर असणारे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांनी प्रभाग २२ हायटेक करण्याची ग्वाही दिली आहे.
या दोघांनी प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणून प्रभागाचा विकास साधण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक २२ येथे कोट्यवधींची कामे झाली आहेत. या पुढील काळात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आमचे लाडके नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराचा कायापालट करण्याचा मानस असल्याचे किसन जाधव म्हणाले.
दरम्यान सोलापूर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग २२ येथील नागोबा मंदिर ते रामवाडी मनपा मिनी झोन परिसर येथे पिण्याच्या पाईपलाईन टाकणं कामाची रक्कम ११ लाख ६५ हजार ९२३ रुपये खर्चित चार इंची पाईपलाईन कामाचे शुभारंभ करण्यात आले. प्रभाग २२ च्या विकासासाठी मी आणि नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड तसेच प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड कटिबद्ध आहोत. प्रभागातील नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्या पद्धतीने आज प्रभाग क्रमांक २२ येथे सर्व सोयीसुविधांमुळे प्रभाग हायटेक झाला आहे, हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचे सहकार्य लाभले याबद्दल त्यांचे मनस्वी आभारही यावेळी किसन जाधव यांनी मानले. या प्रसंगी माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांचे पती ज्ञानेश्वर बुवा जाधव, नागेश किसन काका जाधव, तौफिक शेख,अकबर हवालदार,सादिक शेख,जब्बार हुंडेकरी,साजिद पटेल, अशोक मामा जाधव,मोहसीन जमादार,शोभा ताई गायकवाड,सरोजिनी ताई जाधव,मनीषा जाधव,दया जाधव, फिरोज पठाण, तुषार गायकवाड, रोहित गायकवाड, सय्यद पटेल सायरा,लक्ष्मी गायकवाड, कशिश गायकवाड, सुरेखा केंगार, भीमाबाई गायकवाड, गंगाबाई गायकवाड,माउली जरग,माणिक कांबळे,वसंत कांबळे उत्तम देडे व प्रभागातील बहुसंख्य नागरिक आदींची उपस्थिती होती.