Sharad Pawar : अजित पवारांच्या भाजप प्रवेशाचे शरद पवार यांनी केले खंडन

अजित पवार लवकरच भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार, अशा बातम्यांमुळे राज्यातील वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. मात्र, अजित पवारांबाबतच्या या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (दि. १८) दिले. प्रसारमाध्यमांमध्ये या विषयावर ज्या पद्धतीने वार्तांकन होत आहे, त्याबद्दल शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 19 Apr 2023
  • 01:15 pm
अजित पवारांच्या भाजप प्रवेशाचे शरद पवार यांनी केले खंडन

अजित पवारांच्या भाजप प्रवेशाचे शरद पवार यांनी केले खंडन

अजित पवार लवकरच भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार, अशा बातम्यांमुळे राज्यातील वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. मात्र, अजित पवारांबाबतच्या या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (दि. १८) दिले. प्रसारमाध्यमांमध्ये या विषयावर ज्या पद्धतीने वार्तांकन होत आहे, त्याबद्दल शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. माध्यमांना उद्देशून ते म्हणाले, ‘‘जे तुमच्या मनात आहे, ते आमच्या कुणाच्याही मनात नाही. अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार, या बातम्या निराधार आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसपुरते सांगू शकतो की, राष्ट्रवादीत असे कोणतेही बंड होणार नाही.’’

अजित पवारांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावल्याची चर्चा आहे. याचेही शरद पवारांनी खंडन केले. ‘‘मी राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो की अजित पवारांनी आमदारांची अशी कोणतीही बैठक बोलावलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते कुठे आहेत, हे मला माहिती आहे. अजित पवार सध्या कामात आहेत. वेगवेगळ्या विषयावरून ते आमदारांना मार्गदर्शन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सहकारी एका विचाराने काम करत आहेत. पक्ष अधिक शक्तिशाली कसा बनवायचा, या भूमिकेतून आम्ही सर्वजण काम करत आहोत,’’ असे पवार यांनी ठामपणे सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest