संग्रहित छायाचित्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा सोपवण्यात आली आहे. येत्या 22 तारखेला चाकणकर यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र त्यांच्या नियुक्ती संदर्भात नुकतेच गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले आहे.
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुतीच्या 7 आमदारांचा शपथविधी पार पडला. त्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना देखील संधी मिळू शकते अशी चर्चा होती. त्यांच्या नावाला पक्षातूनच विरोध झाला. त्यामुळे ऐनवेळी त्यांचे नाव यादीतून वागळले गेले. चाकणकर यांना पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे पद पुढील तीन वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील 1993 मध्ये महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. महिलांवर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, महिलांची समाजातली स्थिती सुधारण्यासाठी आणि महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करतं. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. महिला आयोगाच्या अध्यक्षाची आणि सदस्यांची निवड राज्य सरकारकडून होते.