धनगर समाजातील आंदोलकांच्या मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या

धनगर आंदोलकांची आदिवासी कोट्यातून आरक्षणाची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आणि थेट मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्याची घटना घडली आहे. आंदोलकांनी उड्या मारल्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 8 Oct 2024
  • 07:47 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

धनगर समाजातील आंदोलकांच्या मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या

धनगर आंदोलकांची आदिवासी कोट्यातून आरक्षणाची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आणि थेट मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्याची घटना घडली आहे. आंदोलकांनी उड्या मारल्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली.

काही दिवसांपूर्वी आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्या होत्या. यामध्ये विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचाही समावेश होता. या आदिवासी आमदारांचा धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून देण्यास विरोध आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यासहित विविध मागण्यासाठी आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्या होत्या. त्यानंतर आता धनगर समाजाच्या आंदोलकांनी मंत्रालयातील तिसऱ्या माळ्यावरून संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्याची घटना समोर आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest