संग्रहित छायाचित्र
'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात दिली आहे. त्यांच्या या नाऱ्याला नवाब मलिक यांनी विरोध केल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मानखुर्द शिवाजीनगर येथील उमेदवार नवाब मलिक यांनीदेखील अजित पवारांप्रमाणे बाजू मांडली. नवाब मलिक म्हणाले की, ‘‘बटेंगे तो कटेंगेसारखी विधाने चुकीची, घृणास्पद आहेत. यातून कोणताही फायदा होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या राजकारणामुळे उत्तर प्रदेशचे खूप नुकसान झाले आहे.
अगदी मंदिराच्या उभारणीनंतरही उत्तर प्रदेशात भाजपचा दारुण पराभव झाला. त्यामुळे अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांवर राजकारण केले पाहिजे. लोकांच्या विकासाची चर्चा व्हायला हवी.’’ हिंदू-मुस्लिमांच्या नावाने कोणीही देशाचे विभाजन करू नये, असे आवाहनदेखील मलिक यांनी केले होते.