MPSC News: अखेर १८१३ पदांची मेगा भरती जाहीर; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची दिवाळी

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) एकत्रित घेण्यात येणारी महाराष्ट्र अराजपत्रित गट - ब व गट - क सेवा परीक्षेच्या जाहिरातीकडे राज्यातील विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते. अखेर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एकूण १८१३ पदांची नोकर भरती जाहीर केली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

राज्य सरकारने निवडणूकीपूर्वी घेतला मोठा निर्णय

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) एकत्रित घेण्यात येणारी महाराष्ट्र अराजपत्रित गट - ब व गट - क सेवा परीक्षेच्या जाहिरातीकडे राज्यातील विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते. अखेर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एकूण १८१३ पदांची नोकर भरती जाहीर केली आहे. एमपीएससीने जाहिर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट - ब व गट - क सेवा परीक्षेच्या स्वतंत्र जाहिराती प्रसिध्द केल्या आहेत. गट- ब साठी ४८० रिक्त पदांसाठी तर गट- क च्या १३३३ रिक्त पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. राज्य सरकारने मेगा भरती जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे विधानसभेच्या तोंडावर निर्णय घेत राज्यसरकारने टाईमींग साधला असून लाखो विद्यार्थ्यांची नाराजी दूर केली आहे. 

एमपीएससीद्वारे मागील नऊ महिन्या पासून प्रलंबित असणारी गट ब पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीनुसार  सहायक कक्ष अधिकारी ५५ पदे, राज्य कर निरीक्षक- २०९, पोलीस उपनिरीक्षक- २१६ अशा एकूण ४८० रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ही परीक्षा ५ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. १४ ऑक्टोंबर ते ४ नोव्हेंबर या कालावधी दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहे. 

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उद्योग निरीक्षक- ३९, कर सहायक- ४८२, तांत्रिक सहायक - ९, लिपिक-१७, लिपिक- टंकलेखक - ७८६ अशा एकूण - १३३३ रिक्त पदांसाठी परीक्षा घेतील जाणार आहे. ही २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे.  १४ ऑक्टोंबर ते ४ नोव्हेंबर या कालावधी दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहे. 

दरम्यान, एमपीएससीकडून १ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्धीपत्रकानुसार या दोन गटाची परीक्षेसाठी एकत्रित जाहिरात प्रसिध्द करण्यात येत होती. परंतु परीक्षेच्या निकालप्रक्रियेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणी व उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे व त्यामुळे निकाल प्रक्रियेस होणारा विलंब यामुळे एमपीएससीने ही परीक्षा स्वतंत्र घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे. 

संयुक्त गट 'ब' आणि  संयुक्त गट 'क' स्वतंत्र परीक्षा घेण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला होता. त्यावेळीच विद्यार्थ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्याच वेळी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा न्यायालयीन लढाईत अडकण्याची भीती व्यक्त केली होती. राज्यातील लाखो उमेदवार सरकारी नोकर मिळविण्याचे आशेने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. परंतु निकाला आधिच विद्यार्थी न्यायालयात धाव घेत असल्याने परीक्षा वर्षानुवर्षे न्यायालयीन कचाट्यात अडकली आहेत. तसेच सर्व पदांचा एकत्रित निकाल लावल्याने गुणांचा कट ऑफ यामध्ये चांगलाच फरक पडत होता. यामुळे अनेक उमेदावारांची संधी हुकली होती. आता एमपीएससीने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळणार आहे. 

प्रसिद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट - ब व गट - क सेवा परीक्षेसाठी १९ जानेवारी, २०२३ रोजी परीक्षा योजना प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षा योजनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दोन्ही सेवेची संयुक्त पूर्व परीक्षा प्रथमतः आयोजित करण्यात आली होती.

दरम्यान, एमपीएससीच्या कक्षेबाहेरील सर्व शासकीय कार्यालयातील गट - ब (अराजपत्रित ) व गट - क संवर्गातील ( वाहनचालक वगळून) पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त भरण्यासंदर्भात शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभागाने  १८ जुलै २०२४ रोजी घेतला आहे. या शासन निर्णयानुसार शासनाच्या विविध विभागातील गट ब ( अराजपत्रित ) व गट क या सेवेतील विविध संवर्गाची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत केली जाणार आहे.  गट ब ( अराजपत्रित ) व गट क या सेवेतील विविध संवर्गाची वाढणारी संख्या, त्या अनुषंगाने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत होणारी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच महाराष्ट्र अराजपत्रित गट - ब व गट - क सेवा परीक्षा २०२३ च्या निकाल प्रक्रियेतील आलेल्या तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल प्रकरणे, त्या अनुषंगिक न्यायालयीन निर्णय व त्यामुळे निकालास होणारा विलंब. या सर्व बाबींचा सर्वकष विचार करून गट-ब (अराजपत्रित ) सेवेतील विविध संवर्गाची स्वतंत्र पूर्व परीक्षा व गट क सेवेतील विविध संवर्गांची स्वतंत्र पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे. गट - ब व गट - क सेवांकरीता अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे राहील. परंतु गट-ब व गट-क असा सेवानिहाय पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात येईल. असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.  या निर्णयानुसार गट ब ( अराजपत्रित ) सेवा संयुक्त परीक्षा व महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षेच्या परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील. त्याअनुषंगाने संबंधित सेवेच्या स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध करण्याची कार्यवाही आयोगाकडून करण्यात येणार आहे. असे एमपीएससीने प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.  

महाराष्ट्र गट - ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट - क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या दोन्ही परीक्षांच्या जाहिराती आज प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांना अपेक्षित पदांची संख्या नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. पदांच्या संख्येमध्ये वाढ झाली नाही तर विद्यार्थ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. सरकारने व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तात्काळ दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. 
- नितीन आंधळे, स्पर्धा परीक्षार्थी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest