Maharashtra Election 2024 : महाराष्ट्राची निवडणूक एकाच टप्प्यात ! २० नोव्हेंबरला मतदान, २३ ला मतमोजणी

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यातील २८८ मतदारसंघात एकाच टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत.

Maharashtra Election 2024

Maharashtra Election 2024 : महाराष्ट्राची निवडणूक एकाच टप्प्यात ! २० नोव्हेंबरला मतदान, २३ ला मतमोजणी

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यातील २८८ मतदारसंघात एकाच टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत सात टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. मात्र विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून 'दे धक्का' मानला जात आहे.  

केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केल्याने आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे.

निवडणूक कार्यक्रमाविषयी माहिती देताना राजीव कुमार म्हणाले की, "महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २९ ऑक्टोबर हा असेल, तर ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज  मागे घेण्याची मुदत असणार आहे. "

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest