Dabholkar murder : दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास पूर्ण, सुनावणी सुरू

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील खंदे नेतृत्व आणि विवेकवादी विचारवंत डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून त्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली आहे. यामुळे न्यायालयाने सीबीआयचा तपास बंद केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 19 Apr 2023
  • 01:17 pm

दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास पूर्ण, सुनावणी सुरू

#मुंबई

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील खंदे नेतृत्व आणि विवेकवादी विचारवंत डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून त्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली आहे. यामुळे न्यायालयाने सीबीआयचा तपास बंद केला आहे.

आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली असे स्पष्ट करत हायकोर्टाने न्यायालयाच्या देखरेखीखालीन्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्या खंडपीठानेही आपल्या आदेशात नमूद केले की, ‘‘सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने एजन्सीच्या मुख्यालयात पूर्ण अहवाल सादर केला आहे. या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.’’ त्यामुळे सध्याच्या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून त्याची सुनावणी सुरू असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

या प्रकरणात मार्च २०२३ पर्यंत, फिर्यादी पक्षाने १८ साक्षीदार तपासले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी  हत्या करण्यात आली होती. दोन व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. २०१४ पासून हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात आले. तेव्हापासून उच्च न्यायालय तपासावर लक्ष ठेवून होते. सीबीआयने वेळोवेळी न्यायालयाला अहवाल सादर केला होता. उच्च न्यायालयाने सांगितले की, दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांची सीबीआय तपासावर देखरेखीसाठी याचिका दाखल केली होती. अधिक देखरेखीची आवश्यकता नाही, असे म्हणत न्यायालयाने ती निकाली काढली आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest