इलाका तेरा, धमाका मेरा !
#सिंधुदुर्ग
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कोकण दौऱ्यादरम्यान सिंधुदुर्गात लावण्यात आलेल्या बॅनरची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. ‘इलाका तेरा, धमाका मेरा’ असा उल्लेख असलेले बॅनर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले वर्तमान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात लावण्यात आले आहेत.
या दौऱ्यादरम्यान राऊत यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात लावण्यात आलेल्या या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाने थेट त्यांना आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. बॅनरवर संजय राऊत यांचा फोटा आणि त्यासोबत 'इलाका तेरा धमाका मेरा' असा इशारा देण्यात आलेली वाक्य लिहिण्यात आली आहेत. सिंधुदुर्गचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले आहेत.
कणकवलीतही पटवर्धन चौकासह अनेक ठिाकणी संजय राऊत यांचं स्वागत करणारे पोस्टर लावण्यात आले होते. नारायण राणे यांच्या इलाक्यात जाऊन संजय राऊत यांनी त्यांना खिजवल्याने आता राणे त्यांना काय प्रत्युत्तर देणार, याबाबत उत्सुकता आहे.
मला तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. त्याआधी त्यांनी पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येवरूनही राज्य सरकावर ताशेरे ओढले आहेत. पत्रकार वारिसे यांची हत्या थरकाप उडवणारी घटना आहे. ही राजकीय हत्या असून त्यामागे कोणत्या पक्षाचे लागेबांधे आहेत? घटनेवेळी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही का बंद होते? असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले. सिंधुदुर्गात राजकीय हत्यांची परंपरा आहे असं सांगत राऊत यांनी राणे यांच्यावरही निशाणा साधला. वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.