Uddhav Thackeray : मला एकट्याला भाजपशी लढावे लागेल : उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या आणि संभाव्य घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठे विधान केले आहे. काॅंग्रेसच्या एका बड्या नेत्याशी खासगीत बोलताना ‘‘मला एकट्याला भाजपविरोधात लढावे लागेल,’’ असे वक्तव्य केले आहे. यामुळे मविआच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 19 Apr 2023
  • 01:19 pm
मला एकट्याला भाजपशी लढावे लागेल : उद्धव ठाकरे

मला एकट्याला भाजपशी लढावे लागेल : उद्धव ठाकरे

#मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या आणि संभाव्य घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठे विधान केले आहे. काॅंग्रेसच्या एका बड्या नेत्याशी खासगीत बोलताना ‘‘मला एकट्याला भाजपविरोधात लढावे लागेल,’’ असे वक्तव्य केले आहे. यामुळे मविआच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित होत आहे.

उद्धव ठाकरेंनी एका काँग्रेस नेत्यासोबत असे विधाने केल्याची माहिती  विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

एकीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या असतानाच मंगळवारी (दि. १८) शरद पवारांनी पक्ष एकसंध असून सर्व सहकाऱ्यांची पक्ष शक्तिशाली करण्याची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया देत या चर्चांना स्वल्पविराम दिला आहे. त्यानंतर अजित पवार यांनीही आपली भूमिका मांडत ‘‘मी राष्ट्रवादीतच राहणार,’’ असे सांगत या विषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

राज्याच्या राजकारणात उलथापालथी होत आहेत. एकीकडे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने सलग दहा वर्षे सत्ता उपभोगली. राष्ट्रवादी काॅंग्रेस नेहमी सत्तेला महत्त्व देते. राष्ट्रवादीच्या उदयानंतर २०१४ मध्ये शरद पवारांचा पक्ष प्रथमच विरोधी बाकावर बसला. २०१४ ते २०१९ या काळात राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार होते. २०१९ ला शिवसेना-भाजप युतीचे बिनसले. विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी काॅंग्रेसचा हात आणि घड्याळाची साथ घेत राज्यात सत्ता स्थापली. अडीच वर्षांनंतर फुटीच्या राजकारणाचा फटका मविआला बसला आणि सरकार पडले.

शरद पवार यांची राजकीय भूमिका नेहमीच बदलती राहिली आहे. याची चांगलीच जाणीव उद्धव ठाकरेंना आहे. ही बाब आणि अलीकडे राष्ट्रवादी आणि भाजपची जवळीक तसेच अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा रंगल्या त्यातून उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केले असेल, अशी चर्चा आहे.

शंका, कुशंकेच्या वादळानंतर एकीकडे अजित पवार राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे बोलतात, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे भाजपविरोधात एकटे लढण्याची भाषा करतात. त्यामुळे 

मविआसह  राज्याच्या राजकारणात आलबेल नसल्याचे चित्र आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest