मोठ्याने बोलू नका, तुम्ही माध्यमांसमोर नाहीत

एसटी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जाणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयाने चार खडे बोल सुनावले. सदावर्ते यांची सनद बार कौन्सिलने काही दिवसांपूर्वीच दोन वर्षांसाठी रद्द केली आहे. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 7 Apr 2023
  • 11:48 am
मोठ्याने बोलू नका, तुम्ही माध्यमांसमोर नाहीत

मोठ्याने बोलू नका, तुम्ही माध्यमांसमोर नाहीत

एसटी कामगार नेते गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाने सुनावले

#मुंबई 

एसटी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जाणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयाने चार खडे बोल सुनावले. सदावर्ते यांची सनद बार कौन्सिलने काही दिवसांपूर्वीच दोन वर्षांसाठी रद्द केली आहे. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सुनावणीवेळी त्यांचा आवाज मोठा आणि आक्रमक स्वरुपाचा होता. त्यामुळे उच्च न्यायालयाचे  न्यायमूर्ती पटेल यांनी दोन वेळा सदावर्ते यांना समज दिली. ते म्हणाले की, तुम्ही प्रसार माध्यमासमोर नाहीत. मोठ्याने बोलू नका. आपल्यावरील अन्यायाची दाद मागण्यासाठी तुम्ही येथे आला आहात याचे भान राखून तुम्ही बोला. मीडिया आणि प्रेस माझी बदनामी करत असल्याचा दावा सदवर्ते यांनी न्यायालयात केला. 

वकिली करताना सदावर्ते यांनी अनेकवेळा नियमांचं उल्लंघन केल्याचा आक्षेप आहे. एसटी आंदोलनाच्या वेळी त्यांनी वकिलांचा पोशाख परिधान करून आझाद मैदानात नृत्य  केल्याने ते अडचणीत आले होते. त्यांच्याविरूद्ध सुशील मंचरकर यांनी बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडे तक्रार केली होती. त्याची चौकशी करून काऊन्सिलने सदावर्तेंवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. तसेच सदावर्ते यांना दोन वर्षे वकिली करण्यास मज्जाव बंदी घातली आहे. तसेच सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द केली आहे. 

तसेच काळा कोट परिधान करुन त्यांनी हाताला पट्टी बांधून आंदोलनात भाग घेतला होता. त्यांचे हे कृत्य वकिली व्यवसायाला साजेसे नसल्याचा आक्षेप होता. त्याचबरोबर त्यांनी मराठा आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान माध्यमांसमोर चुकीची वक्तव्ये केल्याचे मंचरकर यांचे म्हणणे होते.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest