'बारसू'वरून 'मविआ'त मतभेद?
#मुंबई
रत्नागिरीतल्या बारसू रिफायनगरी प्रकल्पावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकल्पाबाबात परस्परविरोधी भूमिका घेतल्या आहेत. शरद पवारांनी बारसू प्रकल्प करताना लोकांना विश्वासात घेण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, ठाकरे गटाने या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे.
बारसू प्रकल्पाला होणारा वाढता विरोध पाहता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी विरोध करणाऱ्या स्थानिकांनी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊनच पुढे जावे, असा सल्ला सरकारला िदल्याचे पवारांनी सांगितले होते. शरद पवारांच्या भूमिकेच्या उलट भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. खासदार संजय राऊत थेट म्हणाले की, ‘‘दिल्लीचा आग्रह असल्याने उद्धव ठाकरे यांनी बारसूच्या जागेचा पर्याय सुचवला होता. मात्र, जनतेची इच्छा नसेल तर या ठिकाणीदेखील प्रकल्प नको.’’वृत्तसंस्था