Dilip Walse : दिलीप वळसे पाटलांच्या निकटवर्तीयाने केले बंड

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे कथित राजकीय भूकंप घडवणार असल्याची चर्चा सुरू असतानाच या पक्षाचे मोठे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयाने बंड केल्याचे उघड झाले आहे. वळसे पाटील यांचे निकटवर्तीय देवदत्त निकम यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी वेगळे पॅनल तयार करून पक्षाला अडचणीत आणले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 24 Apr 2023
  • 01:51 pm
दिलीप वळसे पाटलांच्या निकटवर्तीयाने केले बंड

दिलीप वळसे पाटलांच्या निकटवर्तीयाने केले बंड

मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत देवदत्त निकम यांचे वेगळे पॅनल

#मंचर

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे कथित राजकीय भूकंप घडवणार असल्याची चर्चा सुरू असतानाच या पक्षाचे मोठे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयाने बंड केल्याचे उघड झाले आहे. वळसे पाटील यांचे निकटवर्तीय देवदत्त निकम यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी वेगळे पॅनल तयार करून पक्षाला अडचणीत आणले आहे.

देवदत्त निकम यांनी वेगळे पॅनल करून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळी समोर आणली आहे. दिलीप वळसे पाटील यांचा आदेश न मानता त्यांनी बंडखोरी केली. यामुळे देवदत्त निकम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दुसरीकडे ‘‘मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच राहणार आहे,’’ असे निकम यांनी सांगितले.

दिलीप वळसे पाटील यांची एकहाती सत्ता असलेल्या बाजार समितीमध्ये त्यांचेच निकटवर्तीय देवदत्त निकम यांनी बंडखोरी केल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. याचा फटका महाविकास आघाडीला होऊ शकतो, तर तिकडे भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेत निवडणुकीत रंग भरला आहे. मात्र, आता राष्ट्रवादीतील बंड मोडून काढण्यात दिलीप वळसे पाटील यांना यश येतंय का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. 

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest