मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करण्याचा गंभीर प्रकार मंगळवारी (दि. १२) घडला. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. अशा स्थितीत ठिकठिकाणी राजकीय पक्षांच्या नेत्यांचा निवडणूक प्रचारही शिगेला पोहोचला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 13 Nov 2024
  • 04:03 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

चांदिवली विधानसभा मतदारसंघात ताफ्याला रोखण्याचाही प्रयत्न, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे कृत्य असल्याचा दावा

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करण्याचा गंभीर प्रकार मंगळवारी (दि. १२) घडला. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. अशा स्थितीत ठिकठिकाणी राजकीय पक्षांच्या नेत्यांचा निवडणूक प्रचारही शिगेला पोहोचला आहे.

मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार दिलीप लांडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. निवडणूक प्रचार आटोपून परतत असताना काही लोकांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला.

 ज्या लोकांनी मुख्यमंत्र्यांचे वाहन रोखण्याचा प्रयत्न केला ते उद्धव ठाकरे यांच्या गटाचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या प्रचारासाठी वैजापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित केले. या दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुस्लीम व्होट बँक मिळाली असे वाटत असेल, पण ती लवकरच विस्कळीत होईल, असा दावा शिंदे यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे निवडणूक चिन्ह 'मशाल' हे घरे पेटवण्याचे आणि समाजात तेढ निर्माण करण्याचे माध्यम असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले, ‘‘ते मशालीला क्रांतीचे प्रतीक म्हणतात. पण त्यांची मशाल घरे जाळते आणि समाजात तेढ निर्माण करते. त्यांच्या बाजूने वाढणारी मुस्लीम मते लवकरच विखुरली जातील."

महाराष्ट्रात २८८ विधानसभा जागांसाठी २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत असली तरी वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि तिसऱ्या परिवर्तन आघाडीचे उमेदवारदेखील अनेक मतदारसंघात युती आणि आघाडीचे गणित बिघडवण्याची शक्यता आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest