बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. राजेंद्र उमाप यांची निवड

राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी पुणे येथील अ‍ॅड. राजेंद्र उमाप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांना उपाध्यक्ष पदी काम करण्याची दोनदा संधी मिळाली आहे.

 Adv. Rajendra Umap

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. राजेंद्र उमाप यांची निवड

पुणे : राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी पुणे येथील अ‍ॅड. राजेंद्र उमाप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांना उपाध्यक्ष पदी काम करण्याची दोनदा संधी मिळाली आहे. सध्याही ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.  त्यानंतर त्यांना आता अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.  या बार कौन्सिलमध्ये महाराष्ट्र आणि गोवा ही दोन राज्ये आणि दादर नगर हवेली आणि दिव दमण या दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.

दोन लाखाहून अधिक वकील या संघटनेचे सभासद आहेत. त्यांनी यापूर्वी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. ते सध्या आळंदी देवाची येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त आहेत.  ते  चिंचवड देवस्थानचे ट्र्स्टचेही विश्वस्त आहेत. ज्यामध्ये मोरगाव, सिध्दटेक आणि थेऊर अष्टविनायकचा समावेश आहे. याशिवाय विविध पदे ते भूषवित आहेत.

"वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. वकिलांची सुरक्षितता, आरोग्य विषयक आणि इतर प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. बार कौन्सिलचे डिजिटलायझेशन करण्यावर भर असणार आहे. प्रत्येक बार असोसिएशनला बार कौन्सिलच्या योजना लवकरात लवकर माहित होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. वकील  अकादमीसाठी जागा मिळाली आहे. त्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बार कौन्सिलच्या वतीने २०२० पासून झालेल्या नवीन वकिलांचे मोफत मेडिक्‍लेम आणि अपघात क्‍लेम काढण्यात येत आहेत."

अ‍ॅड. राजेंद्र उमाप, नवनिर्वाचित अध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest