Ajit Pawar : ‘राष्ट्रवादी’च्या आणखी एका यादीतून अजित पवारांना वगळले

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून थांबायला तयार नाही. ही चर्चा सुरू असतानाच यात आणखी एका घटनेने भर घातली आहे. मुंबईत झालेल्या पक्षाच्या शिबिराच्या निमंत्रण पत्रिकेत त्यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यापाठोपाठ कनार्टक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसने जाहीर केलेल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही अजित पवार यांचे नाव नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 23 Apr 2023
  • 01:11 am
‘राष्ट्रवादी’च्या आणखी एका यादीतून अजित पवारांना वगळले

‘राष्ट्रवादी’च्या आणखी एका यादीतून अजित पवारांना वगळले

#मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून थांबायला तयार नाही. ही चर्चा सुरू असतानाच यात आणखी एका घटनेने भर घातली आहे. मुंबईत झालेल्या पक्षाच्या शिबिराच्या निमंत्रण पत्रिकेत त्यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यापाठोपाठ कनार्टक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसने जाहीर केलेल्या  पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही अजित पवार यांचे नाव नाही.

अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी असे काही नसल्याची प्रतिक्रिया दिली. खुद्द अजित पवार यांनीही खुलासा करत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा जोरात आहे. त्यातच कनार्टक निवडणुकीसाठी जाहीर स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसने जहीर केली आहे. त्यात अजित पवारांचा समावेश नसल्याने चर्चेला बळकटी मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवत आहे. यासाठी पक्षाने जाहीर केलेल्या यादीत शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यांसह १५ जणांची नावे आहेत. अजित पवार यांनी शनिवारी (दि. २१)एका  मुलाखतीत ‘२०२४च्या आधीच मुख्यमंत्री व्हायला आवडेल,’ अशा आशयाचे विधान केले होते. त्यानंतर संध्याकाळी अचानक पुण्यात अजितदादांचे ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले अनेक बॅनर लागले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले. दुसरीकडे, राष्ट्रवादीने आधी पक्षाचे शिबिर आणि नंतर कर्नाटक निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीतून अजित पवारांचे नाव वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गेल्या दहा दिवसांपासून राज्याचं राजकारण अजित पवार यांच्या भोवती फिरत आहे. अजित पवार आधी नॉट रिचेबल झाल्याने तर्कांना उधाण आलं होतं. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याचा दावा केला. त्यामुळे अजितदादा हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं. अजित पवार यांनीही या अफवा असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला होता. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest