राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. त्यातच राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. दोन्ही निवडणुका एकाचवेळी होणार असल्याने बाजार समिती निवडणुकीला स्थगिती द्यावी यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर त्यास यश आले असून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांना स्थगिती मिळाली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. सोमवारी फॉर्म भरण्याचा पहिला दिवस असला तरी स्थगितीच्या शक्यतेने एकही फॉर्म भरला गेला नाही. मात्र, १८५ फॉर्मची विक्री झाली आहे. एका फॉर्मची दोनशे रुपये अशी किंमत आहे. सोमवारी तीन वाजेपर्यंत फॉर्म भरायची मुदत होती.