Pune : सोशल मीडियावरील ओळख अंगलट, विवाहाच्या आमिषाने तरुणाची २२ लाख रुपयांची फसवणूक

सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून विवाहाच्या आमिषाने तरुणाची २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 29 Oct 2023
  • 02:17 pm

विवाहाच्या आमिषाने तरुणाची २२ लाख रुपयांची फसवणूक

सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून विवाहाच्या आमिषाने तरुणाची २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

गायत्री आणि जय भगवान रोकडे (दोघे रा. संगमनेर, जि. नगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार ३० वर्षीय तरुण नगर रस्त्यावरील वाघोलीत राहायला आहे. सोशल मीडियावर  गायत्री आणि तरुणाची ओळख  झाली होती. त्यांच्यातील संवाद वाढल्यानंतर तरुणीने लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तरुणाला जाळ्यात ओढल्यावर आर्थिक अडचण असल्याचे सांगितले. कौटुंबिक समस्या, नातेवाईकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे सांगत तिने त्याच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने २२ लाख रुपये उकळले.

तरुणाला आर्थिक अडचण आल्याने त्याने तिला काही रक्कम परत करण्याची विनंती केली. त्यानंतर तिने तरुणाला उडवाउडवीचे उत्तरे दिली.  मोबाइल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest