कारागृहातून बाहेर पडताच वाहनचोरी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कारागृहातून बाहेर पडताच वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांना कोरेगाव पार्क पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणी अभिषेक शरद पवार (वय ३६, रा. गुरुवार पेठ), सुजित दत्तात्रय कुंभार (वय ३६ रा. कोंढणपूर, खेड शिवापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कारागृहातून बाहेर पडताच वाहनचोरी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कारागृहातून बाहेर पडताच वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांना कोरेगाव पार्क पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणी अभिषेक शरद पवार (वय ३६, रा. गुरुवार पेठ), सुजित दत्तात्रय कुंभार (वय ३६ रा. कोंढणपूर, खेड शिवापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून  पोलिसांनी चोरट्यांकडून दोन मोटारी, पाच दुचाकी असा दहा लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक पवार आणि सुजित कुंभार यांची येरवडा कारागृहात ओळख झाली होती. जानेवारी महिन्यात जामीन मिळवून कुंभार कारागृहातून बाहेर पडला. पवार २ सप्टेंबर रोजी जामीन मिळवून कारागृहात बाहेर आला. पवारचा जामीन झाल्यानंतर तो कारागृहातून घरी गेला नाही. त्याने कोरेगाव पार्क भागातून एक दुचाकी चोरली. त्याने कुंभारशी संपर्क साधला. पवारने चोरलेली दुचाकी येरवडा कारागृहासमोर असलेल्या मोकळ्या जागेत लावली. कारागृहाच्या मोकळ्या जागेत एका पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकी लावली होती. पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी चोरून पवार पसार झाला. पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली.  त्यांच्याकडून पाच दुचाकी आणि दोन मोटारी जप्त करण्यात आल्या.

दरम्यान, विधानभवनात मंत्र्याला भेटण्यासाठी आलेल्या एकाने मोटार लावली होती. पवार आणि कुंभारने त्यांना गाठले. तुम्ही चुकीच्या पद्धतीने मोटार लावली आहे. तुमच्या मोटारीमुळे अन्य वाहनचालकांना वाहने लावण्यास अडचण येत असल्याची बतावणी केली. मोटार नीट लावतो, असे सांगून दोघांनी मोटारचालकाकडून चावी घेतली. मोटार घेऊन दोघे जण पसार झाले. पुणे स्टेशन परिसरातून प्रवासी घेऊन दोघे जण मुंबईला गेले. दरम्यान, मोटार टोलनाक्यावरून पुढे गेल्यानंतर मोटारमालकाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश आला. त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. खालापूर टोल नाक्याजवळ सापळा लावून पोलिसांनी पवार आणि कुंभार यांना पकडले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest