पुणे पोलीस दलात खळबळ : महिला पोलिसाची मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती

परपुरुषाबरोबर शरीरसंबंध ठेव, तसे केले नाही तर तुला करंट देऊन मारू, अशी धमकी मित्राच्या पत्नीला देणाऱ्या महिला पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.

Pune Crime News

पुणे पोलीस दलात खळबळ : महिला पोलिसाची मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती

करंट देऊन ठार मारण्याची दिली होती धमकी, पोलीस प्रशासनाने केले आरोपीचे निलंबन

परपुरुषाबरोबर शरीरसंबंध ठेव, तसे केले नाही तर तुला करंट देऊन मारू, अशी धमकी मित्राच्या पत्नीला देणाऱ्या महिला पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी याबाबतचे आदेश दिले. याबाबत ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. त्यानुसार, अनघा सुनील ढवळे या महिला पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनघा ढवळे हिची नेमणूक कोथरूड वाहतूक पोलीस विभागात होती. तिने तिच्या मित्राच्या पत्नीला ‘तू परपुरुषाबरोबर संबंध ठेव. तू जर असे केले नाही तर तुला आणि तुझ्या घरच्या लोकांना ठार मारते,’ अशी धमकी दिली होती.

‘‘मी पुण्यातील स्थानिक आहे. माझी गुंडांबरोबर ओळख आहे. मी एक सामाजिक संस्था चालविते. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काळा पैसा चलनात आणते. आमच्या संस्थेकडून नऊ कोटी रुपयांचा व्यवहार झाला. तुझ्या पतीला ४० ते ५० लाख रुपये मिळणार आहेत’, असे सांगत ‘मी सांगेल तशी वागली नाही तर तुला ठार मारू,’’ अशी  धमकी मित्राच्या पत्नीला  ढवळे हिने दिली होती.

 अनघा ढवळेविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ढवळे कोथरूड वाहतूक विभागात नियुक्तीस होती.  गुन्हा दाखल झाल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest