पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून बिहारवरून पुण्यात येत केला तरुणाचा खून

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून बिहारवरून पुण्यात येत एका तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. बावधन पोलीस चौकीजवळील नर्सरीमध्ये बुधवारी (१८ सप्टेंबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 19 Sep 2024
  • 03:33 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मानपाडामार्गे पुन्हा बिहारमध्ये जाणाऱ्या दोघांना अटक

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून बिहारवरून पुण्यात येत एका तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. बावधन पोलीस चौकीजवळील नर्सरीमध्ये बुधवारी (१८ सप्टेंबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

प्रवीणकुमार महतो (वय २५, मूळ रा. मुजफ्फरनगर बिहार) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजीवकुमार सिंह (वय ३३) आणि धीरजकुमार रमोदसिंग (वय २०, दोघे रा. मुजफ्फरनगर बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सरीमध्ये एका तरुणाचा गळा चिरून खून केल्याची माहिती एका नागरिकाने कळवली. बावधन चौकीजवळ असलेल्या एका नर्सरीमध्ये प्रवीण महतो याचा धारदार हत्याराने झोपेत असतानाच गळा चिरून खून करण्यात आल्याचे घटनास्थळी गेल्यावर लक्षात आले.

प्रवीण याच्याकडे एका बड्या कंपनीचे गार्डनिंगचे कंत्राट होते. त्यामुळे या खुनामागे व्यावसायिक वाद आहे का हे तपासले जात होते. मात्र तसे काहीच आढळून आले नाही. त्यानंतर ह्याचे वैयक्तिक संबंध कोणाबरोबर कसे आहेत हे तपासात असताना राजीवकुमारबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले. राजीवकुमार महतो याला त्याच्या पत्नीसोबत प्रवीण महतो याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्या कारणावरून त्याने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून प्रवीणला ठार मारण्याचा विचार केला. प्रवीण झोपेत असताना त्याचा गळा चिरून खून केल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. खून केल्यानंतर राजीवकुमार आणि धीरजकुमार हे दोघे मानपाडामार्गे पुन्हा बिहार येथे पळून जाण्याच्या तयारीत होते याबाबत हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी मानपाडा येथे जाऊन दोघांना अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

फोटो व्हायरल झाल्याने बळावला संशय
प्रवीण याचा खून करण्यासाठी राजीव कुमार हा बिहारवरून पुण्यात आला. त्यानंतर त्याने साथीदाराला घेऊन अनैतिक संबंधाच्या संशयावरून प्रवीण याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासातून उघड झाला आहे. प्रवीण आणि राजीवकुमार याच्या पत्नीचे अनैतिक संबंध मागील चार वर्षांपासून असल्याचा संशय राजीव कुमार याला होता. यावरून त्यांच्यात वादही झाले होते. मागील महिन्यात प्रवीण आणि राजीवकुमार याच्या पत्नीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर संशय बळावत केल्याने राजीवकुमार पुण्यात आला आणि त्याने हा खून केला. प्रवीण याचा खून कोणी आणि का केला याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नसताना सोशल मीडिया आणि तांत्रिक माहितीच्या मदतीने हिंजवडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोघा आरोपींना अटक केली.

राजीवकुमार हा बिहारमधील सरकारी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करतो. सात वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. मात्र त्यानंतर दोघेजण विभक्त झाले. दरम्यान पत्नीचे आपल्याच गावात राहणाऱ्या एका तरुणाशी फोनद्वारे सातत्याने संपर्क होत असल्यानेच ती आपल्यापासून विभक्त झाल्याचा संशय राजीवकुमार आला होता. गावातच राहणारा तरुण म्हणजे प्रवीणकुमार हा असून, तो पुण्यात व्यवसाय करत असल्याचे राजीवकुमारला समजले. मात्र प्रवीण कुमारला शोधायचे कसे हा प्रश्न होता. दरम्यान, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी म्हणजेच धीरजकुमार हा प्रवीण कुमार याच्याच नर्सरीमध्ये कामाला होता. काही दिवसांच्या सुट्टीसाठी तो गावी गेला होता. तेव्हा राजीवकुमार याला प्रवीणकुमारचा पत्ता समजला. प्रवीण कुमार हाही राजीवकुमार याच्या विभक्त पत्नीला भेटण्यासाठी गावाकडे जात असे. मागील महिन्यात तो गावी जाऊन आला होता.  तर धीरज कुमार हा सोमवारी पुण्यात परतणार होता. राजीव कुमार याने धीरज कुमारला हाताशी धरून प्रवीण कुमारला मारण्याचा कट रचल्याचे आणि गुन्हा केल्यानंतर रेल्वेने पुन्हा गावाकडे परतण्याचे नियोजन केले होते. खून केल्यानंतर हे दोघे पुन्हा रेल्वेने गावाकडे जात होते मात्र घटनेची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कल्याण पोलिसांशी संपर्क साधला आणि  ते मुंबईकडे रवाना झाले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest