येरवडा: विसर्जन मिरवणूकीनंतर वाढदिवसाला जाण्यासाठी दिला नकार, मित्रानेच मित्राच्या डोक्यात कोयत्याने केले वार

येरवडा: येरवड्यात सोमवारी गणपती विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर वाढदिवस साजरा करण्यासाठी येण्यास नकार दिल्याने मित्राने मित्राच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार केले. यासह भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या डोक्यात टोळक्याने कोयत्याने वार करून महिलेला मारहाण केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dilip Kurhade
  • Wed, 18 Sep 2024
  • 05:23 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मायलेकावरही टोळक्यांचा हल्ला

येरवडा:  येरवड्यात सोमवारी गणपती  विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर वाढदिवस साजरा करण्यासाठी येण्यास नकार दिल्याने मित्राने मित्राच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार केले. यासह भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या डोक्यात टोळक्याने कोयत्याने वार (Machete Attack) करून महिलेला मारहाण केली. त्यामुळे येरवड्यात एकच गोंधळ उडाला.

या गुन्ह्यात  पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आकाश आनंद कुसाळे (वय.२३, रा.वडार वस्ती,येरवडा) याने फिर्याद दिली आहे. त्यावरून सिद्धांत विष्णू गुंजाळ (वय.२३),आशिष मनोहर धोत्रे (वय.३०),राहुल माळगांवकर (वय.२८), कपिल धोत्रे (वय.३४), रोहन मिलिंद कुसाळकर (वय.३०), रोहित किसन शिंदे (वय.२३),मयूर विष्णू गुंजाळ (वय.२३) आणि सागर रमेश मोहिते (वय.३२, रा.सर्व .वडार वस्ती,येरवडा) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा भागातील गणेशोत्सव मंडळांची सोमवारी रात्री विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर आरोपी सिद्धांत गुंजाळ हा आकाश कुसाळे याच्या घरी आला. आशिष धोत्रे याचा वाढदिवस असून तो साजरा करण्यासाठी चल म्हणाला. मी थकलो आहे, येत नाही असे उत्तर कुसाळे याने दिले. त्याचा राग आल्याने गुंजाळ याने लोखंडी हत्याराने कुसाळे याच्या डोक्यात वार केला. कुसाळे याच्या डोक्यातून रक्त वाहू लागल्याने शेजारी राहणारे नीलम शेलार आणि त्यांचा मुलगा रोहन भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आले. त्यामुळे आरोपी गुंजाळ याने रोहन शेलार याच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींच्या टोळक्याने दोन्ही जखमी तरुणांना आणि नीलम शेलार या महिलेला मारहाण करून बघून घेण्याची धमकी दिली. येरवडा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलीस व्यग्र असल्याने फरार आरोपींचा शोध घेऊ शकले नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest