येरवडाः महिला घरीही असुरक्षित; दीराने प्रॅापर्टीच्या वादात वहिनीवर फेकले उकळते तेल

येरवडाः येरवडा येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीत लक्ष्मी सुधाकर कदम (वय ७० वर्षे) या एका धार्मिक कार्यक्रमानंतर घरी जात होत्या. याच वेळी त्यांचे दीर गौतम नामदेव कदम (वय ६० वर्षे) यांनी पूर्वनियोजित कट रचून लक्ष्मी कदम यांच्यावर उकळते गरम तेल तोंडावर टाकले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dilip Kurhade
  • Wed, 18 Sep 2024
  • 05:55 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

येरवडा येथील डॅा बाबासाहेब आंबेडकर सोसायटीतील घटना

येरवडाः येरवडा येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीत लक्ष्मी सुधाकर कदम (वय ७० वर्षे) या एका धार्मिक कार्यक्रमानंतर घरी जात होत्या. याच वेळी त्यांचे दीर गौतम नामदेव कदम (वय ६० वर्षे) यांनी पूर्वनियोजित कट रचून लक्ष्मी कदम यांच्यावर उकळते गरम तेल तोंडावर टाकले. यामध्ये त्या गंभीर भाजल्या त्यांच्यावर पुणे शहरातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

लक्ष्मी कदम व गौतम कदम यांच्यामध्ये प्रॉपर्टीवरून वाद होते. त्यांच्यामध्ये वेळोवेळी वाद होत असत. लक्ष्मी सोमवारी सायंकाळी चार वाजता एक धार्मिक कार्यक्रम आटपून डॅा. आंबेडकर सोसायटीच्या हॅाल मधून पायी घरी जात होत्या. त्याच वेळी पूर्व नियोजित कट केल्याप्रमाणे गौतमने उकळते तेल लक्ष्मी यांच्या तोंडावर टाकले. त्यमाध्ये त्या गंभीर भाजल्या. त्यांच्यावर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उकळते तेल तोंडावर टाकल्याने त्यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

लक्ष्मी कदम यांचे सामाजिक कार्य आहे. येरवडा येथील महिला मंडळाच्या त्या अध्यक्षा आहेत. गेली दोन महिने त्यानी डॅा. आंबेडकर सोसायटीत वर्षावास या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या समारोपानंतर त्या घरी जात असताना त्यांच्यावर दीराने उकळते तेल टाकल्यानुळे  परिसरातील नागरिकांना विशेषतः महिला सभासदांना धक्का बसला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest