येरवडाः विवाह न केल्याच्या रागात प्रियकराने केला विवाहित महिलेचा कोयत्याने खून

येरवडाः कळस येथे मंगळवारी रात्री आठ वाजता प्रियकराने प्रेयसीने दुसऱ्या तरूणाबरोबर प्रेमविवाह केल्याच्या रागात प्रेयसीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यामध्ये प्रेयसी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. पोलीसांनी जखमी तरुणीला ससून मध्ये उपचारासाठी दाखल केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dilip Kurhade
  • Wed, 18 Sep 2024
  • 05:47 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

कळस येथे पायी घरी जात असताना महिलेवर केले कोयत्याने वार; गंभीर जखमी महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

येरवडाः कळस  येथे मंगळवारी रात्री आठ वाजता  प्रियकराने प्रेयसीने दुसऱ्या तरूणाबरोबर प्रेमविवाह केल्याच्या रागात प्रेयसीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यामध्ये प्रेयसी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. पोलीसांनी जखमी तरुणीला ससून मध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र बुधवारी सकाळी उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू झाला. 

गौरी लगेश आरे (वय २५, रा. कळस, मूळ रा. बीड) यांचे आरोपी अमोल कांबळे याच्या बरोबर गेली आठ ते दहा वर्ष प्रेमसंबंध होते. दरम्यान गौरी यांनी लगेश याच्या बरोबरही प्रेम होते . गौरी व लगेश यांनी तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. याचा राग अमोल कांबळेला होता. तो त्यांच्या मागावर होता. त्याला गौरीला मारण्याची संधी मिळत नव्हती. 

दोन महिन्यापूर्वी गौरी व लगेश आळंदी रस्त्यावरील कळस येथे राहण्यास आले होते. याची माहिती मिळताच अमोल कांबळे  पुण्यात आला होता. मंगळवारी रात्री गणपती  विसर्जनाची धामधूम सुरू  होती. गौरी काही वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. याच वेळी कांबळे गौरीच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यात धारदार कोयत्याने दोन वार केले. गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. विश्रांतवाडी पोलीस गणेश विसर्जनात होते. घटना घडल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली. पोलीस आणि त्यानंतर रूग्णवाहिका येण्यास विलंब झाला. गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या गौरीला ससून रूग्णालयात दाखल करण्यात वेळ झाला. त्यानंतर सुरू झालेल्या उपचाराला प्रतिसाद दिला नाही. गौरी यांचा बुधवारी सकाळी आठच्या दरम्यान मृत्यू झाला. 

गौरीला दिड वर्षांचा मुलगा आहे. लगेश ड्रायव्हरचे काम करतो. तर आरोपी कांबळे मिळेल ते रोजंदारीचे काम करतो. दरम्यान कांबळेने कोयत्याने गौरीवर वार केल्यानंतर परिसरातील एका इमारतीमध्ये लपून बसला होता. पोलीसांनी   कांबळेला शोधून काढत अटक केल्याची माहिती विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी दिली. दरम्यान परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, येरवडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest