लाच मागणारी महिला अटकेत, दोघांवर गुन्हा दाखल

उत्पन्नाचा दाखला व डोमीसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यातील २ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना महा ई-सेवा केंद्रातील कर्मचारी महिलेला रंगेहात पकडण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 19 Sep 2024
  • 03:08 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

उत्पन्नाचा दाखला व डोमीसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यातील २ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना महा ई-सेवा केंद्रातील कर्मचारी महिलेला रंगेहात पकडण्यात आले. पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने दिघी येथील गुरुदेव दत्त महा ई-सेवा केंद्र येथे बुधवारी (१८ सप्टेंबर) ही कारवाई केली.

संतोष बबन वाळके (वय ४८), नंदा राजू शिवरकर (वय ३६), यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ५४ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाकडे तक्रार केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानचे उप अधीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष वाळके याचे दिघी येथे गुरुदेव दत्त महा ई-सेवा केंद्र आहे. तर नंदा शिवरकर ही महा ई-सेवा केंद्रात काॅम्प्युटर ऑपरेटर आहे. तक्रार ५४ वर्षीय व्यक्ती उत्पन्नाचा दाखला तसेच डोमीसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी गुरुदेव दत्त महा ई-सेवा केंद्रात गेले. आमची तहसील कार्यालयात ओळख असून, दाखला काढून देण्यासाठी पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून वाळके आणि शिवरकर यांनी लाचेची मागणी केली. त्यानंतर ५४ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. संतोष वाळके आणि नंदा शिवरकर यांनी शासकीय शुल्का व्यतिरिक्त पाच हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. दोन हजार ५०० रुपयांची लाच नंदा शिवरकर हिने स्वीकारली. यावेळी तिला ताब्यात घेण्यात आले. अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उप अधीक्षक डॉ. शीतल जानवे आणि पथकाने ही कारवाई केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest