पुणे : लँड माफियाला गोळीबार प्रकरणी बेड्या; घरामधून १ बंदुक, १७५ वेगवेगळी काडतुसे, पिस्तुलाची ४० काडतुसे, दोन बॅरल, ३ रिकाम्या मॅग्झीन जप्त

आर्थिक देवाण - घेवाणीतून उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न करणारा लॅंड माफिया दशरथ उर्फ बापू शितोळेला रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या शेतातून ताब्यात घेण्यात आले.

Pune Crime News

पुणे : लँड माफियाला गोळीबार प्रकरणी बेड्या; घरामधून १ बंदुक, १७५ वेगवेगळी काडतुसे, पिस्तुलाची ४० काडतुसे, दोन बॅरल, ३ रिकाम्या मॅग्झीन जप्त

पुणे : आर्थिक देवाण - घेवाणीतून उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न करणारा लॅंड माफिया दशरथ उर्फ बापू शितोळेला रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या शेतातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पोलिसांनी एक बंदुक, १७५ जिवंत काडतुस व पिस्टलचे ४० जिवंत काडतुस हस्तगत केले. याप्रकरणी एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) व उरुळी कांचन ग्रामीण पोलिसांनी हि कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आरोपी बापू उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे (वय ४६), निलीमा बापु उर्फ दशरथ शितोळे (वय ४२), जिग्नेश बापु उर्फ दशरथ शितोळे (वय १९), आशा सुरेश भोसले (वय ५२), निखील अशोक भोसले (वय २५, सर्व रा. इनामदारवस्ती, कोरेगाव मुळ ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने बुधवार (ता. १८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शेतकरी काळुराम महादेव गोते व शरद कैलास गोते (दोघे रा. भिवरी, ता. हवेली) यांचे आरोपी बापू उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे यांच्याशी आर्थिक व्यवहार होते. यामध्ये गोते यांचे शितोळे यांच्याकडे चाळीस लाख रुपये दीड वर्षापूर्वी दिलेले होते. काळुराम गोते यांना त्यांचे पैसे परत देतो माझ्या घरी या असे सांगितले होते.

घरी बोलावून पैसे परत मागितल्याच्या रागातून बापू शितोळे यांनी त्यांच्याकडील परवाना असलेल्या पिस्तुलामधून काळुराम गोते यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यामध्ये काळूराम यांच्या हाताला व पायाला गोळ्या लागुन ते गंभीर जखमी झाले. तर, शरद गोते यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेत अधीक्षक देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखा, उरुळी कांचन पोलीस स्टेशन कडील वेगवेगळी पथके तयार करुन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना एका खबऱ्याकडून आरोपीनबाबत माहिती मिळाली. गुन्ह्यातील मुख्य आरोपी रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या शेतामध्ये लपुन बसल्याचे समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, सपांगे, पोलीस उपनिरीक्षक अमित सिद-पाटील, काशीनाथ राजापुरे उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार बाळासाहेब कोरडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, विजय कांचन, विनोद पवार, स्वप्नील अहिवळे, बाळासाहेब खडके, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील अंमलदार अजित काळे, रमेश भोसले, प्रमोद गायकवाड, प्रवीण चौधर, मनिषा कुतवळ, यांनी केली असून पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील हे करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest