पिंपरी-चिंचवड : उंचावरून पडून कामगाराचा मृत्यू

बांधकामावर काम करत असलेल्या एका कामगाराचा लाकडी पहाडावरून पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (२७ जून) सायंकाळी पाच वाजता नाणेकरवाडी येथे घडली. सूर्यकांत गणेश बाशिंगे असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

चाकण : बांधकामावर काम करत असलेल्या एका कामगाराचा लाकडी पहाडावरून पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (२७ जून) सायंकाळी पाच वाजता नाणेकरवाडी येथे घडली. सूर्यकांत गणेश बाशिंगे असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

या प्रकरणी सूर्यकांत यांच्या पत्नीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिगंबर नरसिंह जाधव (वय ३५, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी जाधव याने बाशिंगे यांना भोसरी नाका येथून नाणेकरवाडी येथे बांधकामावर मिस्त्री म्हणून कामाला नेले. बांधकामावर कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही खबरदारी जाधव यांनी घेतली नाही. इमारतीला प्लास्टर करण्यासाठी बांधलेल्या लाकडी पहाडावरून बाशिंगे खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest