पुणे: ‘एल थ्री’ बार पार्टी प्रकरणी आणखी दोघे अटकेत; अमली पदार्थांचा पुरवठा केल्याने आले गोत्यात

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या ‘एल थ्री’बारमध्ये झालेल्या पार्टीदरम्यान मेफेड्रोनचे सेवन करण्यात आले होते. याप्रकरणात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोघांसह त्यांना एमडी देणाऱ्या नायजेरीयन तरूणासह तिघांना अटक करण्यात आली होती.

Pune News, Pune Crime News, L3 Drugs Party

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या ‘एल थ्री’बारमध्ये झालेल्या पार्टीदरम्यान मेफेड्रोनचे सेवन करण्यात आले होते. याप्रकरणात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोघांसह त्यांना एमडी देणाऱ्या नायजेरीयन तरूणासह तिघांना अटक करण्यात आली होती. या पार्टीत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या आणखी दोघांची नावे निष्पन्न करण्यात आली असून शिवाजीनगर पोलिसांनी या दोघांना देखील बेड्या ठोकल्या आहेत. मोबाईलवर सोशल मिडियाचा वापर करून या ड्रग्जची विक्री करण्यात येत होती. 

अक्षय स्वामी, आर्यन पाटील अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापूर्वी अभिषेक अमोल सोनवणे, ओंकार अशोक सकट, तसेच नायजेरियन नागरिक इडोको स्टेव्हली संडे या तिघांना अटक केली होती. ‘एल थ्री’ बारमधील पार्टीप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. या पार्टीदरम्यान मेफेड्रोनचे सेवन करणारे नितीन ठोंबरे (वय ३४, रा. गोरेगाव, मुंबई) आाणि करण मिश्रा (वय ३४, रा. मुंढवा) यांना देखील गजाआड करण्यात आले होते.  पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अभिषेक सोनवणे याने ठोंबरे आणि मिश्रा या दोघांना मेफेड्रोनची विक्री केल्याचे समोर आले आहे. त्याचे साथीदार असलेल्या सकट, इडोको संडे यांच्याकडे पोलीस तपास करीत होते. चौकशीदरम्यान स्वामी, पाटील हे मेफेड्रोन विक्रीमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले. या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest