पिंपरी-चिंचवड: गॅस कनेक्शन हेल्डअप झाल्याचे सांगत सहा लाखांची फसवणूक

एमआयडीसी भोसरी: गॅस कनेक्शन हेल्डअप झाले असून रजिस्ट्रेशन प्रोसेस करावी लागेल, असे सांगत एका व्यक्तीची सहा लाख सहा हजार ४८६ रुपयांची फसवणूक केली. ही घटना ९ जून रोजी शाहूनगर चिंचवड येथे घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 1 Jul 2024
  • 02:31 pm
Pimpri Chinchwad Crime News, MIDC Bhosari Police Station, Fraud News

संग्रहित छायाचित्र

एमआयडीसी भोसरी: गॅस कनेक्शन हेल्डअप झाले असून रजिस्ट्रेशन प्रोसेस करावी लागेल, असे सांगत एका व्यक्तीची सहा लाख सहा हजार ४८६ रुपयांची फसवणूक केली. ही घटना ९ जून रोजी शाहूनगर चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ९८३५५३५९०९, ६३६२१०६५१४ क्रमांकधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो एमएनजीएल गॅस कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांचे गॅस कनेक्शन हेल्डअप झाले आहे. त्यामुळे त्याचे रजिस्ट्रेशन करावे लागेल, असे आरोपीने सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना एमजीएनएल गॅस बिल update.apk ही लिंक पाठवून ती ओपन करायला सांगितले. नेट बँकिंग द्वारे पाच रुपये पाठवण्यास फिर्यदिस भाग पडले. त्यानंतर बँकेच्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीने फिर्यादी यांच्या बँक खात्यातून सहा लाख सहा हजार ४८६ रुपये काढून घेत फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest