पुणे: भरधाव कारच्या धडकेत येरवडा कारागृहाचे ‘सीनियर जेलर’ जखमी

पुणे : येरवडा कारागृहात ‘सीनियर जेलर’ असलेल्या एका अधिकाऱ्याला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात हा अधिकारी जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात रविवारी सकाळी घडला.

Pune, Pune News, Yerwada Jail, Pune Accident

संग्रहित छायाचित्र

पुणे : येरवडा कारागृहात ‘सीनियर जेलर’ असलेल्या एका अधिकाऱ्याला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात हा अधिकारी जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात रविवारी सकाळी घडला.

सायबन्ना खंडाप्पा हरवाळकर (वय ३२, रा. लोहगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जेलर आनंदा शंकरराव कांदे (वय ५५, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदे हे येरवडा मध्यवर्ती कारागृहात वरिष्ठ कारागृह अधिकारी आहेत. ते रविवारी सकाळी दुचाकीवरून भाजी आणण्यासाठी जात होते. विमाननगर येथील टाटा गार्डरूम चौकात ते सिग्नल लाल झाल्याने उभे होते. पाठीमागून हरवाळकर चालवीत असलेली भरधाव कार कांदे यांच्या दुचाकीला धडकली. ही धडक जोरात बसल्याने कांदे रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागला आहे. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest