हिंजवडी: रुग्णालयाला पावणेचार लाखांचा गंडा

रुग्णालयात फ्रंट डेस्क स्टाफ म्हणून काम करणाऱ्या महिलेने रुग्णांकडून येणारी रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर घेत हॉस्पिटलची पावणे चार लाखांची फसवणूक केली. हा प्रकार २६ जून रोजी उघडकीस आला

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 1 Jul 2024
  • 02:26 pm
Pimpri Chinchwad Crime News, Hinjewadi Police Station

संग्रहित छायाचित्र

रुग्णांकडून येणारे पैसे स्वतःच्या खात्यावर घेतले, कर्मचारी महिलेवर गुन्हा दाखल

रुग्णालयात फ्रंट डेस्क स्टाफ म्हणून काम करणाऱ्या महिलेने रुग्णांकडून येणारी रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर घेत हॉस्पिटलची पावणे चार लाखांची फसवणूक केली. हा प्रकार २६ जून रोजी उघडकीस आला असून त्यापूर्वी सहा महिन्यांपासून महिलेने स्वतःच्या बँक खात्यावर पैसे घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

डॉ. किरण रंगराव मुळे (वय ४३, रा. भूमकर वस्ती, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाल्हेकरवाडी येथील एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला फिर्यादी मुळे यांच्या गोल्डन केअर हॉस्पिटल भुमकर चौक येथे फ्रंट डेस्क स्टाफ म्हणून काम करत होती. महिलेने रुग्णालयातील रुग्णांकडून येणारी रक्कम हॉस्पिटलच्या बँक खात्यावर न घेता स्वतःच्या दोन बँक खात्यांवर घेतली. मागील सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. महिलेने तीन लाख ७८ हजार २४० रुपये स्वतःच्या बँक खात्यावर घेत त्या रकमेचा अपहार केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest