पुणे: परताव्याच्या आमिषाला बळी पडून चक्क पोलिसाने गमावले सात लाख

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या फसणुकीला चक्क पोलीस शिपाईच बळी पडला आहे. सायबर चोरट्यांनी पुणे शहर पोलीस दलातील एका पोलीस शिपायाची सात लाखांची फसणूक केली आहे.

संग्रहित छायाचित्र

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या फसणुकीला चक्क पोलीस शिपाईच बळी पडला आहे.  सायबर चोरट्यांनी पुणे शहर पोलीस दलातील एका पोलीस शिपायाची सात लाखांची फसणूक केली आहे.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस वसाहतीमधील एका शिपायाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा मिळेल, अशी जाहिरात फिर्यादीने सोशल मीडियावर पाहिली. गेल्या नोव्हेंबरमध्ये पाहिलेल्या जाहिरातीनुसार चांगला परतावा मिळेल, या आमिषाला बळी पडत त्याने जाहिरातीवरील संपर्क क्रमांकावर फोन केला. तेव्हा सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. चोरट्यांनी त्यांना एका ॲपबाबत माहिती दिली. मोबाइलमध्ये संबंधित ॲप समाविष्ट केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना गुंतवणूक करण्यास सांगितले.

त्यानंतर गेल्या आठ महिन्यात त्याने चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी सात लाख ४५ हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी ॲपच्या माध्यमातून त्यांना चांगला परतावा मिळाल्याचे भासविले. ॲपद्वारे परताव्यापोटी जमा झालेली रक्कम त्यांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रक्कम मिळाली नाही. चोरट्यांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest