पुणे: नव्या कायद्यानुसार हाणामारीचा पहिला, तर सोनसाखळी चोरीचा दूसरा गुन्हा दाखल

पुणे : संपूर्ण देशात नवे फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी १ जुलै पासून सुरू करण्यात आली आहे. नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार (बीएनएस) पुण्यात पहिले दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

New Laws, New Criminal Laws, Bhartiya Nyaya Samhita, Bhartiya Nagarik Suraksha Samhita

संग्रहित छायाचित्र

वारजे आणि हडपसर पोलिसांनी नोंदवल्या पहिल्या दोन तक्रारी

पुणे : संपूर्ण देशात नवे फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी १ जुलै पासून सुरू करण्यात आली आहे. नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार (बीएनएस) पुण्यात पहिले दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये वारजे पोलीस ठाण्यात पहिला तर हडपसर पोलीस ठाण्यात दूसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलीस ठाण्यात हाणामारीचा तर हडपसर पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा दूसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिद्धार्थ पाटोळे, सिद्धेश भोसले, बाळा (पूर्ण नाव पत्ता नाही) यांच्यासह त्यांच्या साथीदारावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ११८ (२), ११५ (२), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अक्षय सुरेश तुपे (वय ३२, रा. साई कॉर्नर, शिवगंगा सोसायटी, कॅनल रोड, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवार, १ जुलै रोजी मध्यरात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास वारजे येथील कालवा रस्त्यावरील दत्त मंदिराजवळ असलेल्या पान टपरी शेजारी घडली. वारजे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  फिर्यादी तुपे हे मेट्रोसाठी काम करणाऱ्या स्तर्लिंग अँड विल्सन या कंपनीत नोकरी करतात. तुपे आणि त्यांचे मित्र दत्ता साबळे असे या पानटपरीजवळ गप्पा मारत उभे होते. त्यावेळी त्यांच्यापासून काही अंतरावर आरोपी सिद्धार्थ पाडोळे, सिद्धेश भोसले आणि बाळा नावाचे तरुण त्यांच्या साथीदारांसह उभे होते.

आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तसेच, एकाच भागात राहणारे आहेत. आरोपी दारू प्यायलेले होते. त्यांची आणि तुपे यांच्या मित्राची त्यांच्याशी वादावादी झाले. त्यावरून वाद पेटला. फिर्यादी तुपे हे मध्यस्थी करण्यास गेलेले असताना त्यांना आरोपींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. कोणत्या तरी कठीण वस्तूने त्यांच्या डोक्यावर पाठीमागे जोरदार प्रहार करण्यात आला. तसेच, रस्त्यावर पडलेल्या सिमेंटच्या ब्लॉकने आणि हाताने बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार धनंजय देशमुख करीत आहेत.

तर, दूसरा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्याने जात असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्यात आली. ही घटना हडपसरच्या साडेसतरानळी येथील साईसंकल्प सोसायटीसमोर सोमवारी सव्वाचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी शामादेवी रामाशिष शर्मा (वय ७३) यांनी फिर्याद दिली आहे. शर्मा या साईसंकल्प सोसायटीसमोरून पतीसह दूध आणण्यासाठी पायी चालत जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरुन एमएच १४, जीझेड ६३८४ वरुन दोन तरुण त्यांच्याजवळ आले. काही कळण्याच्या आतच पाठीमागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यामधील ६० हजार रुपयांची दोन तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. आरोपींच्या मोटार सायकलचा क्रमांक त्यांनी टिपून घेतला. तो पोलिसांना दिला असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक कवळे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest