महाळुंगे: हिस्सा न दिल्याने आईची कार जाळली, मुलावर गुन्हा दाखल

महाळुंगे: मुलाला त्याचा हिस्सा आणि पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलाने आईची कार जाळली. ही घटना शनिवारी (दि. २९) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील बोरदरा या गावात घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 1 Jul 2024
  • 02:29 pm
Pimpri Chinchwad Crime News

संग्रहित छायाचित्र

महाळुंगे: मुलाला त्याचा हिस्सा आणि पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलाने आईची कार जाळली. ही घटना शनिवारी (दि. २९) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील बोरदरा या गावात घडली.

पृथ्वी देविदास पडवळ (वय 24, रा. वडमुखवाडी, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी खेड तालुक्यातील बोरदरा येथे राहणाऱ्या पृथ्वी याच्या आईने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पृथ्वी हा आई-वडिलांपासून विभक्त राहतो. तो आईकडे वारंवार त्याचा हिस्सा आणि पैसे मागत होता. त्याला हिस्सा आणि पैसे न दिल्याच्या कारणावरून त्याने फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांच्या घरासमोर पार्क केलेली कार जाळली. यामध्ये कारचे आणि घराचे नुकसान झाले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest