“मर्डर केस मागे घे”, जीवे मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

“तु माझेवर टाकलेली मर्डर केस मागे घे, नाहीतर तुझ्या तुझ्या मुलांना ठार मारून टाकील”, अशी धमकी दिली. तसेच मारहाण करत आरोपीने महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 3 Jul 2023
  • 04:48 pm
murder case : “मर्डर केस मागे घे”, जीवे मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

जीवे मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

हिंजवडी पोलीसांनी आरोपीला केली अटक

तु माझेवर टाकलेली मर्डर केस मागे घे, नाहीतर तुझ्या तुझ्या मुलांना ठार मारून टाकील”, अशी धमकी दिली. तसेच मारहाण करत आरोपीने महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पिंपरी चिंचवडमधील पुनावळेतील रसिकवाडी परिसरात २ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी आरोपीला हिंजवडी पोलीसांनी अटक केली आहे.

मल्हारी व्यंकटेश केराळे, (वय ३९, रा. सावरगाव, ता. लोहा, जि.नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळेतील रसिकवाडी येथे आरोपीने रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पीडित महिलेचा रस्ता आडवून शिवीगाळ केली. तु माझेवर टाकलेली मर्डर केस मागे घे, नाहीतर तुझ्या नवऱ्याला जसे ठार मारले तसे तुला व तुझ्या मुलांना ठार मारून टाकील, अशी धमकी आरोपी पीडितेला दिली. तसेच आरडा ओरडा करत महिलेचे केस पकडुन हाताने मारहाण केली. त्यानंतर जवळ ओढून महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी हिंजवडी पोलीसांनी आरोपीला अटक केली. त्याच्यावर कलम ३५४, ३४१, ३२३, ५०४, ५०६ सह क्रि. लॉ अॅमेटमेंट ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest