वारकऱ्यांनो सावधान ! मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय, दोन जणांना अटक

आषाढी वारी अद्याप सुरूवात देखील झाली नाही. मात्र, पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अगोदर गर्दीचा फायदा घेवून सोन्याची चैन आणि मोबाईल चोरणारे चोरटे सक्रिय झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मोबाईल चोरीच्या तयारीत असणाऱ्या दोन चोरट्यांना पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने ९ जून रोजी केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 10 Jun 2023
  • 10:55 am
Ashadhi wari : मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय, दोन जणांना अटक

मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय, दोन जणांना अटक

चोरट्यांकडून १ लाख १० रुपयांचे ७ मोबाईल फोन जप्त

आषाढी वारी अद्याप सुरूवात देखील झाली नाही. मात्र, पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अगोदर गर्दीचा फायदा घेवून सोन्याची चैन आणि मोबाईल चोरणारे चोरटे सक्रिय झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मोबाईल चोरीच्या तयारीत असणाऱ्या दोन चोरट्यांना पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने ९ जून रोजी केली आहे.

श्रीकांत राजु जाधव (वय २१, रा. दर्ग्याजवळ, सर्वोदय कॉलणी, मुंढवा पुणे) आणि दिलीप बलभिम गायकवाड (वय ३३, रा. सर्वोदय कॉलणी, मुंढवा पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ लाख १० हजार रुपये किमतीचे एकुण विविध कंपन्याचे ०७ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

आज दुपारी २ च्या सुमारास संतश्रेष्ठ जगदगुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. तर ११ जून रोजी आळंदी येथुन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजाचे पालखीचे प्रस्थान होणार आहे. सदरचा पालखी सोहळा हा १२ जुन रोजी पुण्यात आगमण होणार असुन १२ व १३ तारखेला पुण्यात मुक्कामी आहे. त्यामुळे आळंदी आणि देहूनगरीत वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

मात्र, पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अगोदर गर्दीचा फायदा घेवून सोन्याची चैन आणि मोबाईल चोरणारे चोरटे सक्रिय झाले आहेत. अशातच पालखी सोहळ्याला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यानुसार, हडपसर येथे पालखी मार्गावर गस्त घालत असताना युनिट ०५ च्य़ा पथकाला वारकऱ्यांच्या गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरी करण्याचे इरादयाने शहरात फिरत असलेल्या चोरट्याबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी सापळा रचून हडपसर येथील रविदर्शन चौकातून श्रीकांत आणि दिलीपला ताब्यात घेतले.

त्यांची अंगझडती घेतली असता १ लाख १० हजार रुपये किमतीचे एकुण विविध कंपन्याचे ०७ मोबाईल फोन आढळुन आले. यावेळी त्यांच्याकडे विचारपूस केली असता चोरलेले मोबाईल फोन हे कर्नाटक येथे पाठवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यातील आरोपी श्रीकांत जाधव याचेवर घरफोडी, पाकिटमारी, मोबाईल चोरीचे एकुण २४ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपास समोर आले आहे. हे गुन्हे मुंढवा, हडपसर, बंडगार्डन आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest