वारजे गोळीबार प्रकरण, अवघ्या २४ तासात तीन आरोपींना अटक

पुण्यातील वारजे येथील रामनगर परिसरात शनिवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तीन जणांना अवघ्या २४ तासात पोलीसांनी अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 19 Jun 2023
  • 12:33 pm
Warje firing  : वारजे गोळीबार प्रकरण, अवघ्या २४ तासात तीन आरोपींना अटक

वारजे गोळीबार प्रकरण, अवघ्या २४ तासात तीन आरोपींना अटक

वारजे माळवडी पोलीसांची कामगिरी

पुण्यातील वारजे येथील रामनगर परिसरात शनिवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तीन जणांना अवघ्या २४ तासात पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी सूरज लंगर (२१) याच्यावर गोळीबार केला होता. यात सुरजच्या कमरेला गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना रविवारी वारजे माळवडी पोलीसांना गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांबद्दल माहिती मिळाली. गोळीबार करणारे तिघे वारजे येथून लाल-काळया रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून तोंडाला रूमाल बांधून चांदणी चौकाच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून तीन जणांना ताब्यत घेतले. त्यांच्याकडे असलेले दोन देशी बनावटीची गावठी पिस्तूल पोलीसांनी जप्त केले आहेत. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या २४ तासात पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. तीनही आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास वारजे माळवडी पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest