Pune Crime News : वाहन आणि चैन चोरी करणारा अटकेत; गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

चैन व वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलीसांनी (Arrested) अटक केली आहे. ही कारवाई पुणे पोलीसांच्या ( Pune Police) गुन्हे शाखा युनिट ६ (Crime Branch Unit 6 ) च्या पथकाने मंगळवारी (दि. ७) केली आहे. तसेच चोरट्यांवरील दोन गुन्ह्यांची उकल देखील करण्यात आली आहे. (Pune Crime News)

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 8 Nov 2023
  • 02:02 pm
Pune Crime News : वाहन आणि चैन चोरी करणारा अटकेत; गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

वाहन आणि चैन चोरी करणारा अटकेत; गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

आरोपींकडून दोन गुन्ह्यांची उकल

चैन व वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलीसांनी (Arrested) अटक केली आहे. ही कारवाई पुणे पोलीसांच्या ( Pune Police) गुन्हे शाखा युनिट ६ (Crime Branch Unit 6 ) च्या पथकाने मंगळवारी (दि. ७) केली आहे. तसेच चोरट्यांवरील दोन गुन्ह्यांची उकल देखील करण्यात आली आहे. (Pune Crime News)

योगेश जगदीश सोनवणे (वय २३, रा. घर नंबर ७३४, अडीकँप चौक, नानपेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा यूनिट ६चे पोलीस वडगाव बुद्रुक परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोल्डन बेकरीसमोर रेकॉर्डवरील चोरटा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, सापळा रचून पोलीसांनी त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा सुझुकी अक्सेस दुचाकीवरून त्याचा साथीदार राहुल कांबळे याचेसह केल्याची कबुली दिली.

चाकी वाहनाबाबत पोलीसांनी माहिती घेतल्यास आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून कोथरुड पोलीस ठाण्यात त्याच्या गुन्हा दाखल असल्याचे तपासात समोर आले. या भागात चैन स्नॅचिंग, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीसांनी पुढील तपासासाठी चोरट्याला खडकी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी रामनाथ पोकळे (अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे), अमोल झेंडे पोलीस (उप आयुक्त गुन्हे), सतीश गोवेकर (सहा. पोलीस आयुक्त सो गुन्हे २) यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पो हवा रमेश मेमाने, पो अं ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest