फुकट कपड्यांसाठी दुकानाची तोडफोड, पोलीसांनी टोळक्यांची काढली धिंड

फुकट कपडे दिले नाही म्हणून दुकानाची तोडफोड करणाऱ्या टोळक्यांना पोलीसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. आरोपींची थेट दुकानासमोरूनच पोलीसांनी धिंड काढली आहेत. एकूण तीन आरोपींची पुण्यातील चंदननगर पोलीसांनी धिंड काढली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 6 Jul 2023
  • 02:05 pm
police arrested gangs : फुकट कपड्यांसाठी दुकानाची तोडफोड, पोलीसांनी टोळक्यांची काढली धिंड

पोलीसांनी टोळक्यांची काढली धिंड

चंदननगर परिसरातील दुकानाची टोळक्यांनी केली होती तोडफोड

फुकट कपडे दिले नाही म्हणून दुकानाची तोडफोड करणाऱ्या टोळक्यांना पोलीसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. आरोपींची थेट दुकानासमोरूनच पोलीसांनी धिंड काढली आहेत. एकूण तीन आरोपींची पुण्यातील चंदननगर पोलीसांनी धिंड काढली आहे.

याबाबत हंसराम प्रजापती यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ एप्रिल रोजी काही टोळके चंदननगर परिसरातील एका कपड्याच्या दुकानात घुसले. यावेळी तीन जणांनी दुकान मालकाकडे फुकट कपडे देण्याची मागणी केली. मात्र, दुकान मालकाने फुकट कपडे देण्यात नकार दिला.

दुकान मालकाने नकार दिल्यामुळे टोळक्यांनी दुकानाची तोडफोड केली. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकणाचा चंदननगर पोलीस तपास करत आहेत. पोलीसांच्या तपासामध्ये संकेत खोत व इतर दोन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी त्यांना पकडून तोडफोड करण्यात आलेल्या दुकानातून धिंड काढली. पोलीसांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होते आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चंदननगर पोलीस तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest