Bhosari : रात्री घराजवळ लघुशंका करताना हटकले म्हणून तिघांकडून दोघांना बेदम मारहाण

रात्री घराजवळ लघुशंका करताना हटकले म्हणून तिघांनी दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (२ नोव्हेंबर) रात्री भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीत घडली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Fri, 3 Nov 2023
  • 06:07 pm

रात्री घराजवळ लघुशंका करताना हटकले म्हणून तिघांकडून दोघांना बेदम मारहाण

रात्री घराजवळ लघुशंका करताना हटकले म्हणून तिघांनी दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (२ नोव्हेंबर) रात्री भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीत घडली आहे.

याप्रकरणी मल्हारी जनार्दन पाटोळे (वय ३५ रा.भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून भोसरी पोलिसांनी शिवप्रकाश गौतम, गोलु कुमार, जोगेश कुमार (सर्व रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, पाटोळे हे त्यांच्या घरी झोपले असता त्यांना आरोपी हे त्यांच्या घराजवळ जवळच राहणारे आरोपी हे लघुशंका करताना दिसले. यावेळी पाटोळे यांनी त्यांना हटकले. याचा राग येवून आरोपींनी पाटोळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

भांडणाचा आवाज आल्याने शेजारी राहणारे विजेंद्र इंगळे भांडणे सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करत दोघांनाही जखमी केले. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास घेत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest