Crime News : रिक्षा चालकांकडून चोराचा खून; स्वारगेट चौकातील घटनेमुळे खळबळ

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा सभागृहाजवळील सार्वजनिक रस्त्यावर उभी असलेली ऑटो रिक्षा चोरून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या २६ वर्षीय चोरट्याला रिक्षा चालकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत चोरट्याचा जागीच मृत्यू झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 26 Oct 2023
  • 11:29 am
Crime News : रिक्षा चालकांकडून चोराचा खून; स्वारगेट चौकातील घटनेमुळे खळबळ

रिक्षा चालकांकडून चोराचा खून; स्वारगेट चौकातील घटनेमुळे खळबळ

लक्ष्मण मोरे

पुणे : स्वारगेट येथील गणेश कला (Pune Crime News) क्रीडा सभागृहाजवळील सार्वजनिक रस्त्यावर उभी असलेली ऑटो रिक्षा ( Swargate) चोरून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या २६ वर्षीय चोरट्याला रिक्षा चालकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत चोरट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दसऱ्याच्या दिवशी (२४ ऑक्टोबर) संध्याकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी स्वारगेट (Swarget Police) पोलिसांनी चार रिक्षा चालकांना अटक केली आहे.

सचिन राजेंद्र नाईक (वय ३२, रा. आदर्श नगर, धनकवडी), गणेश राजेंद्र नाईक (वय ३६, रा. आंबीलओढा वंशात, सदाशिव पेठ), अमोल वसंत घोलप (वय ३८, रा. शनिनगर, जांभळवाडी, कात्रज), प्रकाश सखाराम घाटे (वय २०, रा. स्वारगेट रिक्षा स्टॅन्ड जवळ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक दिनकर पाटील (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंचाच्या जवळ असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर या चौघांपैकी एकाची रिक्षा उभी करण्यात आलेली होती. ही रिक्षा घेऊन अज्ञात चोरट्याने पळ काढला. त्यावेळी या सर्व रिक्षाचालकांनी त्याला पकडले आणि लाथा बुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

या अमानुष मारहाणीमध्ये त्याला प्राण गमवावा लागला. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान प्रत्यक्ष साक्षीदार यांची जबाब आणि घटनास्थळावरील वस्तूनिष्ठ पुरावा आणि खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपींनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest