डंपरमधून डिझेलची चोरी, दोन जणांना अटक

तळेगाव एमआयडीसी पोलीसांनी ही कारवाई केली आहे. ही चोरी गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास मावळमधील मंगळूर येथे घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 8 Sep 2023
  • 04:17 pm

डंपरमधून डिझेलची चोरी, दोन जणांना अटक

पार्किंगमध्ये थांबलेल्या डंपर मधून ७० लिटर डिझेल चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीसांनी ही कारवाई केली आहे. ही चोरी गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास मावळमधील मंगळूर येथे घडली.

या प्रकरणी गणेश पांडुरंग चौधरी (वय ३६ रा. मंगळूर, मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी चांद परिमलदास (वय २७ पश्चिम बंगाल) आणि शुभमकर गौरांगदास (वय २८, रा. मंगळूर, मावळ) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी पार्क केलेल्या डंपर एम एच १२ क्यू डब्ल्यू २९४९ च्या टाकीमधून ६ हजार पाचशे १० रुपयांचे ७० लिटर डिझेल काढून घेतले होते. यावेळी ते दुचाकीवरून पळून जात असताना त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest