पिंपरी-चिंचवड : तरुणास बेदम मारहाण

खुन्नस दिल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला घरातून बाहेर ओढत मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. २९) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास साखरे वस्ती, हिंजवडी येथे घडली.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

खुन्नस दिल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला घरातून बाहेर ओढत मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. २९) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास साखरे वस्ती, हिंजवडी येथे घडली.

योगेश भास्कर भालेराव (वय २४, रा. साखरे वस्ती, गणपत कॉलनी, हिंजवडी) यांनी मंगळवारी (दि. ३०) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी करण लोखंडे (रा. काळाखडक, वाकड), विष्णू पवार (रा. वडगाव मावळ) बाबू खान (रा. काळा खडक, वाकड), अरविंद कोळी (रा. वाकड) रुषि जाधव (रा. तळेगाव) आणि साहिल सुरुशे (रा. हिंजवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश हे साखरे वस्ती, हिंजवडी येथील आपल्या घरी असताना सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आरोपी तिथे आले. त्यांनी खुन्नस देण्याच्या कारणावरून योगेश यांना घराच्या बाहेर ओढून आरोपी लोखंडे याने हाताने मारहाण केली. आरोपी विष्णू याने फिर्यादीचा जीव जाईल याची जाणीव असतानाही योगेशवर कोयत्याने वार केला. परंतु तो कोयत्याचा वार योगेश यांनी चुकविल्याने गाडीवर बसून योगेश यांच्या दुचाकी गाडीचे नुकसान झाले. इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Share this story

Latest