संग्रहित छायाचित्र
गांजा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी वाघोली येथून एक जणास ताब्यात घेण्यात आले आहे. वाघोली पोलिस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांद कासम पठाण (वय ४४, रा. वाघोली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबरला गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, ऋषीकेश ताकवणे व रमेश मेमाणे हे अंमली पदार्थ विक्रीवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना वाघोली येथील भैरवनाथ मंदिराजवळ रस्त्यावर एक व्यक्ति गांजा विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी अचानक छापा घातला. या ठिकाणी चांद कासम पठाण या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याककडे ३०० ग्रॅम विक्रीसाठी बाळगलेला गांजा मिळून आला. चांद कासम पठाण विरुद्ध वाघोली पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कामगिरी सदरची कामगीरी मा.अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा.पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक, युनिट -6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, समीर पिलाने, बाळासाहेब तनपूरे, गणेश डोंगरे, किर्ती नरवडे, प्रतीक्षा पानसरे यांनी केली.