अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाई, युनिट ६ ची कामगिरी

वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत केसनंद येथील अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट ६ ने ही कारवाई केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Sun, 27 Oct 2024
  • 01:54 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत केसनंद येथील अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट ६ ने ही कारवाई केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबरला युनिट ६ चे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक अवैध धंदे प्रतिबंधासाठी गस्त घालत होते. यावेळी केसनंद गाव ते थेऊर रस्त्यावर एक व्यक्ति हॉटेल महाराजा येथे विनापरवाना देशी तसेच विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती  पथकाला मिळाली. या ठिकाणी पथकाने अचानक छापा घातला. पथकाने या ठिकाणाहून लक्ष्मणसिंह रघुवीरसिंग बिस्ट (वय ३२, रा. केसनंद-थेऊर रोड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५हजार ८७० रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. तसेच त्याच्या विरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा, कलम 65 (ई )अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest