Crime News : पतीला खायला घातली नखे आणि मायाजाळ; सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल

पतीला नखे खायला घालून तसेच पतीवर जादूटोण्याचे प्रयोग केले. हा प्रकार पतीने सासू, सासऱ्यांना सांगितला असता सासू, सासरे आणि अन्य नातेवाईकांनी पतीला मारहाण केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 23 Oct 2023
  • 06:16 pm

पतीला खायला घातली नखे आणि मायाजाळ; सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी मेव्हण्याला केली अटक

पतीला नखे खायला घालून तसेच पतीवर जादूटोण्याचे प्रयोग केले. हा प्रकार पतीने सासू, सासऱ्यांना (father-in-law) सांगितला असता सासू, सासरे आणि अन्य नातेवाईकांनी पतीला मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. २०) तापकीर चौक, काळेवाडी (Crime News) येथे घडला.

योगेश शिवाजी आपुणे (वय ३३, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस (Wakad Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासरे गोपाळ लिंबराव शिंदे (वय ५५), सासू (वय ५०), मेहुणा अनिल गोपाळ शिंदे (वय २५), अक्षय गोपाळ शिंदे (वय २३), शिवाजी राऊत (वय ३४, रा. लोणी काळभोर), महिला (वय ३०), योगेश याची पत्नी (वय २७, रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश यांचे पत्नीसोबत कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. त्यानंतर पत्नीने मोहोळ येथील बाबाजी शेख याच्याशी फोनवर बोलून जादूटोणा करण्याबाबत विचारपूस केली. योगेशला जेवणात नखे आणि इतर काही वस्तू खायला देण्याबाबत चर्चा झाल्याचे कॉल रेकॉर्डिंग योगेशनी पत्नीच्या मोबाईलमध्ये ऐकले. त्याबाबत त्यांनी सासू सासरे यांना सांगितले. त्यानंतर सर्व आरोपींनी योगेश यांना नखे खाऊ घालणे, मायाजाळ नावाची वस्तू व इतर वस्तू पाण्यात मिसळून खायला देण्याचे प्रकारे केले.

सासरे गोपाळ शिंदे यांनी यांनी योगेशच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली. महुण्याने योगेशना कोयत्याने मारहाण केली. सासूने योगेशच्या डोक्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर आरोपींनी योगेशला, ‘तू जिथे दिसशील तिथे तुला आम्ही जीवे मारू’ अशी धमकी दिली. तर पत्नीने योगेशला ‘जर आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली तर मी आत्महत्या करेन’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मेहुणा अनिल शिंदे याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest