Pune Crime News : पिझ्झाची डिलिव्हरी झाली उशिरा, तरुणाने केला थेट गोळीबार

झोमॅटोवरून ऑर्डर केलेली पिझ्झाची डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या डिलिव्हरी बॉयला मारहाण करीत कार मधील पिस्तूल घालून हवेत गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार लोहगाव रोड, वाघोली येथील ओझोन विलाज सोसायटीमध्ये घडला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 24 Oct 2023
  • 09:17 pm
Pune Crime News : पिझ्झाची डिलिव्हरी झाली उशिरा, तरुणाने केला थेट गोळीबार

पिझ्झाची डिलिव्हरी झाली उशिरा, तरुणाने केला थेट गोळीबार

वाघोलीतील घटनेमुळे खळबळ

लक्ष्मण मोरे

पुणे : झोमॅटोवरून ऑर्डर केलेली पिझ्झाची (Pizza) डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या डिलिव्हरी बॉयला मारहाण करीत कार (Zomato) मधील पिस्तूल घालून हवेत गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार लोहगाव रोड, वाघोली येथील (Lohgaon Road) ओझोन विलाज सोसायटीमध्ये घडला.

लोणीकंद पोलीस ठाण्यात याप्रकरणी चेतन वसंत पडवळ (वय २७, रा. डी ३०, रो हाऊस, ओझोन विलाज सोसायटी, वाघोली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पडवळ हा व्यवसायिक आहे. त्याच्या वडिलांचा क्रशरचा व्यवसाय आहे. या व्यवसायात तो मदत करतो. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुण हा वाघोली येथील वाघेश्वर चौकामध्ये असलेल्या ऍन्स्टर सोसायटीमध्ये असलेल्या डॉमिनोज पिझ्झा या दुकानात असोसिएट मॅनेजर म्हणून नोकरी करतो.

सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चेतन पडवळ याने डॉमिनोज पिझ्झाची ऑर्डर झोमॅटो ॲपद्वारे बुक केली होती. ही ऑर्डर फिर्यादीच्या दुकानासाठी बुक करण्यात आली होती. या ठिकाणी काम करणारा डिलिव्हरी बॉय राहुल घोरपडे हा त्याचा सहकारी ऋषिकेश अन्नपूर्णे याच्यासह पिझ्झाची ऑर्डर देण्यासाठी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास चेतन पडवळ याच्या सोसायटीमध्ये गेला. बेल वाजवल्यानंतर त्याने दरवाजा उघडला आणि घोरपडे आणि अन्नपूर्वे या दोघांना पिझ्झा उशिरा आणल्यावरून शिवीगाळ करून करायला सुरुवात केली. अन्नपूर्णे याला हाताने मारहाण केली. हा सर्व प्रकार समजल्यानंतर फिर्यादी हे त्याच्याकडे या संदर्भात विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळी त्याने त्यांची कॉलर पकडून 'तुम्ही इथे का आला?' असे बोलून तो घराबाहेर पळत गेला. दारासमोर उभ्या असलेल्या कारमधून पिस्तूल बाहेर काढले आणि हे पिस्तूल लोड करून हवेमध्ये एक गोळी झाडली.

त्याच्या या गोळी झाडण्यामुळे वरच्या मजल्यावरील एखाद्या व्यक्तीला गोळी लागून त्यांचा मृत्यू होऊ शकतो हे माहिती असताना देखील पिस्तूलाचे ट्रिगर ओढून सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest